शिरसी ग्रामपंचायत संकेतस्थाळावर आपले स्वागत आहे.
मा. स्वर्गीय आर आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना * निर्मल ग्राम. * तंटामुक्त पुरस्कार प्राप्त गाव.
ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी गावातील सर्व शासकीय कार्यालयावरती विधवांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांना सन्मान दिला..
पुढे वाचाशिरसी गावात 26 जानेवारी 2024 पासून सिंगल युज प्लास्टिक उत्पादन वितरण व विक्री यावर कडक बंदीची अंमलबजावणीचा ठराव...
पुढे वाचाजिल्हा परिषद सांगली आरोग्य विभाग यांचे सार्वजनिक पिण्याचे पाणी स्रोत स्वच्छता सर्वेक्षण कमी जोखीम प्रमाणपत्र (हिरवे कार्ड) प्राप्त आहे...
पुढे वाचाशिरसी गावाची स्थापना नवव्या फार प्राचिन काळी झालेली आहे. गावाच्या चारीही बाजूनी डोंगर असून ते सर्व वनराई ने सजलेले आहेत गावात चारीही बाजूनी डोंगराच्या पायथ्याशी पाझर तलाव आहेत. गावाच्या दक्षिण बाजूस मानकरवाडी माध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत. शिराळा तालूक्याच्या उत्तर दिशेला सातारा जिल्हाच्या हद्दीपासून 5 कि.मी. अंतरावर शिरसी गाव वसलेले आहे.
शिरसी गाव हे उत्तर विभागातील मध्यवर्ती असणारे गाव असलेने शेजारील सर्व गावे या गावातील व्यवसाय व बाजारपेठ असलेने संपर्कात आहेत. कित्येक शतका पूर्वीपासून शिराळा तालूका ठिकाणानंतर शुक्रवारी आठवडा बाजार भरतो. आजही मुख्य बाजारपेठ म्हणून शिरसी गाव प्रसिध्द आहे.
गावामध्ये अखंडित वीजपुरवठा आहे, LED बल्ब व पथदिवे यांचा वापर आहे व गावात असलेले सौर्य पथदिवे चालू आहेत
जि. प सांगली आरोग्य विभाग यांचे सार्व. पिण्याचे पाणी स्त्रोत स्वच्छता सर्वेक्षण कमी जोखीम प्रमाणपत्र प्राप्त आहे
चांगले आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आनंद
गाव हा विश्वाचा नकाशा ! गावा वरून देशाची परीक्षा ! गावची भंगाता अवदशा येईल देशा !! जाणावें ग्राम हेचि मंदिर ! ग्रामातील जनसर्वेश्वर सेवा हेचि पूजा समग्र ! हेचि विचार निवेदावा !!
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
स्वच्छ भारत अभियान हा भारताच्या ४,००० हून अधिक शहरांच्या, रस्त्यांच्या व भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने सुरू केलेला राष्ट्रीय पातळीवर अभियान आहे
ग्रामपंचायत शिरसी
text here...
कुटुंबांसाठी बांधण्यात आलेले शौचालय 4 भिंती, दरवाजा व छतासह पूर्णपणे बांधकाम केलेले आहे. तसेच शौचालयासोबत वापरासाठी पाण्याची व हात धुण्याची सुविधा आहे.
सार्वजनिक शौचालये हा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एक घटक आहे. योग्य संख्येत शौचालये, स्नानगृहे, कपडे धुण्यासाठीच्या जागा आणि सहज वापरता येतील अशा जागी उभारली आहे.
पाणी गुणवत्ता तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर अंतर्गत शिरसी गावामध्ये वेळो-वेळी पाणी गुणवत्ता तपासणी केली असता एकदाही लाल कार्ड मिळाले नाही.
सांडपाण्याचे व्यवस्थापन म्हणजे सार्वजनिक आरोग्य, आर्थिक, सामाजिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सांडपाणी हाताळणे वरील सर्व चालू उपक्रम गावामध्ये राबवले आहेत.
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत कंपोस्ट खड्डे, गांडूळ खत निर्मिती, कुटुंबांकडील कचरा गोळा करणे, वेगळा करणे त्याचा पुर्नवापर व विक्री आणि त्यांचे व्यवस्थापन करणे इत्यादी चालू उपक्रम गावामध्ये राबवले आहेत.
शोष खड्ड्यांचे बांधकाम वीटांची वर्तुळाकार रचना करून केली आहे, मुखात सांड पाण्याची विल्लेवाट लावण्यासाठी शोष खड्ड्यांचा प्रकल्प राबण्यात आला आहे व यात कोणतीही तांत्रिक अडचणी येणार नाहीत याची काळजी घेतली आहे.