गावात एकूण चार अंगणवाडी इमारती आहेत .अंगणवाडी केंद्र क्रमांक 147/32/37/70 चारीही इमारती सुसज्ज आहेत. इमारती वरती लहान मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी ,आनंद वाढावा, याकरिता बोलक्या भिंतीच्या माध्यमातून लहान मुलांना आवडतील अशा चित्राच्या माध्यमातून बोलक्या भिंती केलेल्या आहेत ,प्रत्येक इमारतीला शौचालय ,पाण्याची सोय सुविधा, मुलांना बसण्यासाठी बँच ,खेळण्यासाठी विविध वस्तू, टीव्ही ,टीव्ही वरती सॉफ्टवेअर ,प्रत्येक इमारतीला सौर ऊर्जा सिस्टीमच्या माध्यमातून विजेची सोय, गॅस ,शेगडी आवश्यक व परिपूर्ण फर्निचर, पेविंग ब्लॉक, कंपाऊंड यासारख्या बाबींमुळे अंगणवाडीच्या मुलांना शिक्षणाप्रती गोडी निर्माण झाली आहे.