शिरसी गावात 26 जानेवारी 2024 पासून सिंगल युज प्लास्टिक उत्पादन वितरण व विक्री यावर कडक बंदीची अंमलबजावणीचा ठराव संमत झाल्यापासून गावातील दुकानदार, व्यवसायिक या सर्वांना प्रबोधनात्मक माहिती देऊन दंडात्मक नोटीस देऊन गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी यांना प्रबोधन करून प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती करण्यात आली. या चालू उपक्रमांतर्गत सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय तृप्ती धोडमिसे मॅडम यांनी प्लास्टिक संकलन चालू उपक्रमात शिरसी गावात स्वतः सहभागी होऊन लोकांना मार्गदर्शन व प्रबोधन केले. प्लास्टिक च्या वापराबाबत पर्यायी चालू उपक्रमाच्या माध्यमातून प्लास्टिक कमी वापरायच्या सवयी अंगी बनवल्यास व दैनंदिन वापरात सुद्धा प्लास्टिकचा कमीत कमी वापर करून होणारे प्रदूषण टाळता येईल असे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावात प्रबोधन केले.
Highlights here