शिरसी गावचा इतिहास

शिरसी गावाची स्थापना नवव्या फार प्राचिन काळी झालेली आहे. गावाच्या चारीही बाजूनी डोंगर असून ते सर्व वनराई ने सजलेले आहेत गावात चारीही बाजूनी डोंगराच्या पायथ्याशी पाझर तलाव आहेत. गावाच्या दक्षिण बाजूस मानकरवाडी माध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत. शिराळा तालूक्याच्या उत्तर दिशेला सातारा जिल्हाच्या हद्दीपासून 5 कि.मी. अंतरावर शिरसी गाव वसलेले आहे.

शिरसी गाव हे उत्तर विभागातील मध्यवर्ती असणारे गाव असलेने शेजारील सर्व गावे या गावातील व्यवसाय व बाजारपेठ असलेने संपर्कात आहेत. कित्येक शतका पूर्वीपासून शिराळा तालूका ठिकाणानंतर शुक्रवारी आठवडा बाजार भरतो. आजही मुख्य बाजारपेठ म्हणून शिरसी गाव प्रसिध्द आहे.

स्वातंत्र्यपुर्वी काळात जून 1930 पासून प्राथमिक शाळा आहे. 9 जून 1965 पासून भैरवनाथ विद्यालय शिरसी हे माध्यमिक विद्यालय आहे. 7 जानेवारी 1931 पासून शिरसी सेवा सहकारी सोसायटी शेतकऱ्यांना मदतीचा हात देत आहे. सद्या माध्यमिक विद्यालय रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासनाकडे असून गावकऱ्यांच्या सहकार्याने 1 कोटी 15 लाखाची भव्य इमारत, क्रिडांगण, सौचालय, संगणक प्रयोगशाळा व विज्ञान प्रयोगशाळेने सुसज्ज आहे. आजही शालाबाह्य विद्यार्थी नाही. गावात 2 प्राथमिक शाळा , 1 माध्यमिक शाळा, 4 अंगणवाडया ज्ञानदानाचे कार्य उत्कृष्टपणे करीत आहे.

गावाचे प्रवेशव्दारावर श्री काळभैरवनाथाचे प्रशस्त मंदीर आहे. 10 व्या शतकापासून हे मंदीर उभे आहे. गावातील बरेच लोक मुंबई येथे नोकरी उद्योग करतात. सन 1978 पासून प्रत्येक मुंबई स्थित शिरसीकरांनी दर महा 10 रुपये मासिक वर्गणी देवून त्या सर्वांचे सहकार्याने मंदीर व मंदीरा भोवती 13 वर्गखोल्या बांधुन या वास्तूचा देवालय आणि विद्यालय अशी दुहेरी संकल्पना राबवली आजही या इमारतीत जिल्हा मध्यवर्ती बँक, साेसायटी, पतसंस्था, जिम, पारायण मंडळ, पोस्ट, शैक्षणिक अ‍ॅकॅडमी कार्य करीत आहेत येणारे खोल्यांचे भाडयाचे माध्यमातून गावातील सार्वजनिक कामे पार पाडली जातात. या शेजारील दुमदार महादेव व हनुमान मंदीर आहे. पणुंब्रे, घागरेवाडी, शिवरवाडी, आंबेवाडी व शिरसीचे शिवेवर डोंरगरावर चक्रभैरव मंदीर आहे. शिरसी ग्रामस्थांनी दोन वर्षापूर्वी या मंदीराचा जीर्णेेधार करुन भव्य ठ.उ.उ. मंदीर उभे केले आहे.

गावात जलस्वराज्य योजना राबवून मानकरवाडी मध्यम प्रकल्पातून पाणी उचलून नळ पाणी पुरवठा योजना राबवली आहे. गावात कोठेही स्टँन्ड पोस्ट नाही. सर्वांना वैयक्तिक नळ कनेक्शन देवून शुध्द पाणी पुरविले जाते. गावात प्रत्येकाचे घरी शौचालय आहे. अत्यंत सामान्य कुटूंबासाठी 4 सार्वजनिक शौचालय युनिट आहेत. गावातील रस्ते पूर्व पश्चिम असून काँक्रेट रस्त्यांनी ते सुसज्ज आहेत. सर्व रस्त्यांना गटार असल्याने पाणी किंवा डबकी साचून राहत नाहीत. सर्व नाल्यांची वर्षातुन दोनदा साई केली जाते. गावातील सर्व शासकिय कार्यालये, शाळा, अंगणवाडया शौर उर्जेने प्रकाशमान हाेतात. सर्व रस्त्यावरील डांबावर ङएऊ. दिवे लावले आहेत.

गावात 1 प्राथमिक आरोग्यकेंद्र व 1 उपकेंद्र आहे. त्यामार्फत आरोग्य सुविधा लसीकरण, बाळांना इ. आदर्श आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत. गावात जनावरांचा दवाखाना असून प्रशस्त इमारतीत जनावरांना लस, व उपचार केले जातात. गावात बचत गट कार्यरत आसून त्यांचा ग्रामसंघ असून शिरसी ग्रामपंचायत इमारतीत कार्यालय आहे. गावाच्या जवळपास असणाèया वाडया व रस्त्यांवर सौरदिव्यानी प्रकाशमय केलेले आहे.

असे आमचे शिरसी हे टुमदार- सुंदर सर्व सोईनी युक्त असून या गावची लोकसंख्या 2272 आहे. गावाचे 1018.6 हेक्टर इतका विस्तार आहे गावात पोस्ट, जिल्हामध्यवर्ती बँक, पतसंस्था कार्यरत आहे.